सचिन वाझे प्रकरण (Sachin Vaze Case) आता अधिकच गुंतागुंतीचे होऊ पाहात आहे. या प्रकरणात मलिनी झालेली प्रतिमा सावरण्यासाठी महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi ) सरकारने पोलीस दलात काहीसे फेरबदल केले. मुख्य म्हणजे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली. इतरही काही पदांवरील चेहरे बदले. दरम्यान, असे असले तरी हे प्रकरण महाविकासआघाडी सरकारमध्ये बिघाडी करण्यास कारण ठरु शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सचिन वाझे प्रकरणात परम बीर सिंह यांची बदली झाली आणि मुंबई पोलीस आयुक्त पदावर हेमंत नगराळे यांची नियुक्ती झाली. परमबीर सिंह यांची उचलबांगडी केल्यानंतर नागराळे यांनी हा पदभार स्वीकारला. पदभार घेतल्यानंतर नागराळे यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली की, सध्या मुंबई पोलीसांसाठी अडचणीचा काळ आहे. पोलीस दलाची प्रतिमा काहीशी मलीन झाली आहे.
अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नबाब मलिक यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांची बदली करण्याचा प्रशासकीय निर्णय घेतला. त्यांना तो निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतू, वाझे प्रकरणात ज्या गोष्टी पुढे येत आहेत त्यामुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. (हेही वाचा, Mansukh Hiren Death Case: सचिन वाझे यांच्याकडून जप्त केलेल्या 'त्या' Mercedes कारसोबत भाजप पदाधिकाऱ्यांचे फोटो; काँग्रेसने विचारला सवाल)
मुख्यमंत्री ने मुंबई सीपी (परम बीर सिंह) को स्थानांतरित करने के लिए प्रशासनिक निर्णय लिया। उन्हें पूरा अधिकार निर्णय लेने का लेकिन वाजे को लेकर जिस तरह से चीजें सामने आ रही है उससे पूरे मुंबई पुलिस की छवि खराब हुई गई: महाराष्ट्र के मंत्री नवाब मलिक pic.twitter.com/AlO9qzczi9
— ANI_HindiNews (@AHindinews) March 18, 2021
दरम्यान, सचिन वाझे प्रकरणात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही म्हटले आहे की, कोणी जर कायद्याच्या बाहेर जाऊन काम करत असेल तर त्यावर कठोर कारवाई केलीच जाईल. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही म्हटले आहे की, या प्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दोषींना शिक्षा होईलच. फक्त चौकशी होऊ द्या सर्व गोष्टी पुढे येऊ देत.