अंबानी यांच्या अँटिलाबाहेर जिलेडिनच्या कांड्या असलेली गाडी सापडली. त्यानंतर या गाडीशी संबंधित मनसुख हिरेन यांचा मृत्यू (Mansukh Hiren Death Case) झाला. सोबतच या प्रकरणात एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांची एण्ट्री झाली आणि त्यापाठोपाठ एनआयएसुद्धा दाखल झाले. एनआयएने (NIA) सचिन वाझे यांच्याकडून एक मर्सिडीज कार जप्त केली. या कारवरुन आता राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. या कारसोबत भाजप (BJP Leader) नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप कांग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin sawant) यांनी केला आहे. सावंत यांनी याबाबत एक ट्विटही केले आहे. तसेच, या संबंधांबाबत भाजप खुसासा करणार का असा सवालही विचारला आहे.
सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एनआयएने जप्त केलेल्या मर्सिडीज कारसोबत भाजप पदाधिकाऱ्यांचे फोटो पाहायला मिळत आहेत. भाजपचे महाराष्ट्रातील नेते याबाबत खुलासा करणार का? असा सवालही सचिन सावंत यांनी विचारला आहे. (हेही वाचा, Sachin Vaze Suspend: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे निलंबन)
एनआयए करत असलेल्या प्रकरणाचा तपासा आता बराच पुढे गेला आहे. एनआयएने वाझे यांच्या कार्यालयातही तपासणी केली. कार्यालयाची झाडाझडती घेऊन एक लॅपटॉप जप्त करण्यात आला. या लॅपटॉपमधील डेटा या आधीच जप्त केल्याचे एनआयए तपासात पुढे आले. तपासादरम्यान वाझे यांच्याकडे मोबाईल फोनची मागणी केली असता मोबाईल हरवल्याचे त्यांनी सांगितले. परंतू, वाझे यांच्या वक्तव्यावर एनआयएला विश्वास नाही. वाझे यांनी आपला मोबाईल फेकून दिला असवा असा एनआयएला संशय आहे.
Now BJP connection emerges - the Mercedes car allegedly used by Mansukh Hiren on 17th February is seen in a photograph of BJP office bearer of Thane.
Would @BJP4Maharashtra leaders give explanation? pic.twitter.com/w64FAyfDpi
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 17, 2021
दरम्यान, एनआयएने एक मर्सिडिज कारही ताब्यात घेतली आहे. ही कार सचिन वाझे वापरत असल्याचा संशय आहे. या कारमधून रोख रक्कम, नोटा मेजण्याचे मशीन, एक वायर, एक रसायन असलेली बाटली, एक शर्ट-पॅन्ट आदी वस्तू सापडल्याचे समजते.