Coronavirus Vaccine | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) च्या जाहीरनाम्यात भाजपने कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणासाठी मोफत लस (Coronavirus Vaccine) वाटपाचे अश्वासन दिले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यानवरुन (BJP Manifesto in Bihar) शिवसेनेने मात्र आपल्या या जुन्या मित्रपक्षाला सल्ल्याच्ये खोचक शब्दात 'डोस' दिले आहेत. शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना संपादकीयात (Saamana Editorial) म्हटले आहे की, बिहारमध्ये जे काय निकाल लागायचे ते लागतील, पण भाजपने मोफत लसीच्या सुया टोचण्याचे 'फुकट' उद्योग सुरु केले आहेत. बिहारला 'लस' मिळावी याबाबत दुमत नाही. पण इतर राज्ये काही पाकिस्तानात नाहीत. कोरोना लसीचा मुद्दा भाजपच्या बिहारी घोषणापत्रात यावा हे योग्य नाही. लसीचे वितरण सरकारची व राष्ट्रीय भूमिका असायला हवी. ही एकप्रकारे भेदाभेदीच आहे. राष्ट्रीय एकात्मतेस नव्या लसीची गरज आहे.

'नव्या लसीची गरज' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात दै. सामना संपादकीयात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाचे नक्की धोरण काय? त्यांचे दिशादर्शक कोण? याबाबत थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले दिसते. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी जनतेला अश्वासन दिले होते की, कोरोनावर 'लस' येताच ती देशातील सर्वांपर्यंतपोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्न करेले. पंतप्रदानांनी लसीचे वितरण करताना कोठेच जात, धर्म, प्रांत, राजकारण मध्ये आणले नाही. पण आता बिहार विधानसभेच्या प्रचारात भाजप नेत्यांनी विचित्र भूमिका घेतली आहे. कोरोनावरील लसीचे उत्पादन सुरु झाल्यावर बिहारमधील जनतेला ती लस मोफत उपलब्ध केली जाईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तर सांगितले आहे. पण भाजपच्या जाहीरनाम्यातही तसे वचन पहिल्या क्रमांकावर दिले आहे. (हेही वाचा, Shiv Sena On PM Narendra Modi Speech: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुभ्र दाढी, तेजस्वी चेहरा या तेजानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल')

बिहारमध्ये जे काय निकाल लागायचे ते लागतील, पण भाजपने लोकांच्या मनात कोरोनाची भीती वाढवून मोफत लसीच्या सुया टोचण्याचे 'फुकट' उद्योग सुरु केले आहेत. म्हणजेच 'तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला कोरोनाची लस फुकट टोचू' असा हा सौदा आहे. मतदारांना भीती दाखवून लस टोचण्याचा प्रकार निवडणूक आयोगाच्या नजरेतून सुटला कसा? स्वातंत्र्यपूर्व काळात 'तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दुंगी' असा मंत्र होता. त्याच धर्तीवर 'तुम मुझे व्होट दो, हम तुम्हे लस देंगे' असा नारा दिलेला दिसतोय.

दरम्यान, सत्ता मिळविण्यासाठी मतदारांना भुरळ घालण्यासाठी नैतिकतावाले पक्ष कोणत्या थराला जाऊ शकतात ते आता दिसले. मोफत लस फक्त बिहारलाच का? संपूर्ण देशाला का नाही? याचे उत्तर आधी द्या असा, असेही शिवसेनेने म्हटले आहे.