अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईकरांना चांगलाच फटका बसला आहे. या चक्रीवादाळामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. परिमाणी, शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली. तर, अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृत फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी शायरी लिहून महाराष्ट्र सरकारला तिरकस टोला लगावला होता. तर, सरकारची बाजू घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी (Rupali Chakankar) देखील शायरीच्या माध्यमातून अमृता फडणवीसांवर पलटवार केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्र चक्रीवादळाचा सामना करत असताना अमृता फडणवीस यांनी शायरीच्या माध्यमातून राज्य सरकारला टोला लगावला होता. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले असे लिहले होती की, "तुफाँ तो इस शहर में अक्सर आता है! देखें अबके किसका नंबर आता है !" त्यानंतर या ट्विटला रुपाली चाकणकर यांनीदेखील शायरीमधूनच प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, "तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है! महाराष्ट्र इसके साथ हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है!" या ट्विटनंतर सोशल मीडियात दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. हे देखील वाचा- मराठा आरक्षण प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरचं जाहीर करणार - संभाजीराजे छत्रपती
ट्विट-
तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है
महाराष्ट्र इसके साथ तो हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है !! https://t.co/rN7drFeiTu
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 17, 2021
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी तौक्ते वादळालाही राजकीय रंग देण्याच्या प्रयत्नात अजब विधान केले होते. "तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे. त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये. राष्ट्रीय स्तरावरील वादळ असल्यामुळे याची चिंता दिल्लीश्वरांनी करावी. छ. शिवरायांचे राज्य असे अनेक वादळ परतून लावतो. ती हिम्मत दिल्लीश्वर व इथल्या 106 शिपायांमध्ये नाही", असे अमोल मिटकरी यांनी म्हटले होते. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. याला काय म्हणणार??? या माणसाचा कचरा करायला शब्दच नाहीत. हवामान खात्यातील कर्मचारी हे वाचून ढसाढसा रडून मरतील. ते म्हणतील उगाच खर्च करून अभ्यास केला, डिग्री मिळवली... आकाशाला खुन्नस देत मिटकरी उभा आहे ना थर्माकोलची तलवार घेऊन, अशा आशयाचे ट्विट निलेश राणे यांनी केले होते.