विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (, Rashtriya Swayamsevak Sangh) प्रतिवर्षी करण्यात येणारे शस्त्रपूजन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आरएसएसच्या (RSS) शस्त्रपूजेला विरोध दर्शवत काँग्रेस (Congress ) कार्यकर्ते मोहनीश जबालपूरे यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावरुन नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने नाहपूर शहर पोलीस कोतवाली पोलीस स्टेशनला नोटीस बजावली आहे. या प्रकरणात चार आठवड्यामध्ये उत्तर देण्यात यावे असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. या नोटीसमुळे आरएसएस आणि पोलीस यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.
सन 1925 मध्ये विजयादशमीच्या दिवशी आरएसएसची स्थापना नागपूर येथे झाली. याच दिवशी शस्त्रपूजन करण्याची प्रथा आहे. विजयादशमीच्या दिवशी आरएसएस प्रतिवर्षी शस्त्रपूजन करते. काँग्रेस कार्यकर्ते मोहनीश जबलापुरे यांना आक्षेप आहे. यावरुन त्यांनी माहिती मागवली होती. त्यासाठी त्यांनी सन 2018 मध्ये कोतवाली पोलीस स्टेशनकडे माहिती अधिकारात माहितीही मागवली होती. यात त्यांनी संघ मुख्यालयात असे शस्त्रास्त्र पूजन केले जाते का. तसेच, निवडणूक काळात ती शस्त्रे पोलीस ताब्यात घेतात का? असा सवालही उपस्थित करत माहिती मागवली होती. (हेही वाचा, Muslim Brotherhood: मुस्लिम ब्रदरहुड संघटना विचार, कार्य आणि दहशतवाद)
दरम्यान, मोहनीश जबालपूरे यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीला पोलिसांनी कोणत्याही प्रकारे उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी घेतली. त्यानंतर त्यांनी नोटीस बजावली. जबलपुरे यांच्या प्रकरणात पुढच्या चार आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.