अयोध्या निकालाकडे जय-पराजय म्हणून बघू नका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून निर्णयाचे स्वागत
Mohan Bhagwat (Photo credits- ANI)

प्रदीर्घ काळ सुरु राहिलेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर अयोध्या प्रकरणाचा (Ayodhya Disputed Land) निर्णय आला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) विविध पक्षकारांनी आपापल्या भूमिका, दृष्टीकोण ठेवले. या सर्वांचा परामर्श घेऊन न्यायालयाने हा समाधानकारक निर्णय दिला, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सरसंघचालक मोहन भागवत ( Mohan Bhagwat)  यांनी न्यायालयीन निर्णायाचे स्वागत केले आहे. या वेळी बोलताना भागवत यांनी निकालाकडे जय-पराजय या दृष्टीने पाहू नका असेही सांगितले.

या वेळी बोलताना मोहन भावगवत म्हणाले, संघ कोणते आंदोलन करत नाही. संघ हा मानव निर्मितीचे काम करतो. या निर्णयाचा आनंद साजरा करताना लोकांनी संयम राखावा. असे भागवत म्हणाले. दरम्यान, मशिदीसाठीही अयोध्येतच जागा देण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटल्याकडे लक्ष वेधले असता, ते सरकारला ठरवायचे आहे. संघ त्याबाबत काय सांगणार?, असा सवाल भागवत यांनी उपस्थित केला. (हेही वाचा, अयोध्या में मंदिर, महाराष्ट्र मे सरकार,जय श्रीराम, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनीही यानिकालाच्या पार्श्वभूमीवर ट्विट करत जनतेला शांतता आणि सलोखा राहिल याची खबरदारी घेण्याचे अवाहन केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही देशातील नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे अवाहन केले आहे.