Ayodhya Judgment: अयोध्या में मंदिर, महाराष्ट्र मे सरकार,जय श्रीराम, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Sanjay Raut (Photo Credits: Facebook)

Ayodhya Judgment: पहले मंदिर फिर सरकार, अयोध्या में मंदिर,महाराष्ट्र मे सरकार...जय श्रीराम! असे म्हणत अयोध्या जमीन वाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना-भाजप यांच्यातील सत्तासंघर्षामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेला सत्तासंघर्ष पाहता राऊत यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून भाजपला पुन्हा एकदा डिवचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. देशाच्या राजकारणासोबतच महाराष्ट्रातील राजकारणातही शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी राम मंदिर आणि अयोध्या हा मुद्दा गेली अनेक वर्षे वापरला आहे. अयोध्या जमीन वाद न्यायलयात प्रलंबित असतानाही हे दोन्ही पक्ष मंदिर वही बनाएंगे असे म्हणत होते.

दरम्याना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (8 नोव्हेंबर 2019) पत्रकार परिषदेत अयोध्या निकालाबाबत वक्तव्य केले होते. अयोध्या प्रकरणाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. अयोध्या प्रकरणी केंद्र सरकारला कोणतेही श्रेय घेता येणार नाही. हे श्रेय असेलच तर ते न्यायालयाचे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. (हेही वाचा, Ayodhya Judgment: अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायलयाचा ऐतिहासिक निर्णय; वादग्रस्त जमीन रामलल्लाची, मशिदीसाठी पर्यायी 5 एकर जमीन)

संजय राऊत ट्विट

अयोध्या, राम मंदिर हा शिवसेना, भाजप आणि हिंदुत्ववादी मंडळींसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे गेली अनेक वर्षे हा विषय राज्य आणि देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी होता. अखेर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. हा निकाल अंतिम संजमजला जाणार आहे.