Mohan Bhagwat | X @ANI

पहलगाम मध्ये 26 निष्पाप पर्यटकांवर गोळ्या झाडल्याच्या घटनेनंतर भारता प्रमाणेच परदेशातूनही शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या वेळी साक्षीदार असलेल्या अनेकांच्या कथा अंगावर काटा आणणार्‍या आहेत. दहशतवाद्यांच्या क्रुर कृत्याला जसाच तसे प्रत्युत्तर दिले जावं अशी भावाना व्यक्त होत असताना आरएसएस प्रमुख मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनीही समाजातील एकता आणि जवळीकतेच्या महत्त्वावर भर देण्याचा सल्ला दिला आहे पण असं मुंबईत झालेल्या कालच्या (24 एप्रिल) मंगेशकर प्रतिष्ठानच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. नक्की वाचा: PM Narendra Modi On Pahalgam Terror Attack: 'दहशतवाद्यांना आणि या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला निर्धार .

धर्म विरूद्ध अधर्माची लढाई असल्याची मोहन भागवतांची भावना

सध्या सुरू असलेली लढाई ही दोन पंथांमधील नाही तर धर्म आणि अधर्म यांच्यामध्ये आहे. हिंदू कधीच धर्म विचारून कोणाला मारणार नाही. पण पहलगाम मध्ये कट्टरपंथीयांनी धर्म विचारून हिंदूंची हत्या केली आहे. आता मनात दु:ख आहे पण त्यासोबतच राग देखील आहे. आपण असे लोक आहोत जे प्रत्येकामध्ये चांगले पाहतात आणि सर्वांना स्वीकारतो. आपल्या देशाकडे सैन्य आहे, पण एक वेळ अशी होती जेव्हा आपल्याला वाटलं होतं आता सैन्याची गरज नाही. युद्ध होणार नाही असे वाटून आपण आरामात होतो. 1962 मध्ये प्रकृतीने आपल्याला धडा शिकवला. तेव्हापासून आपण आपले संरक्षण मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत. वाईटाचा नाश केला पाहिजे. राग आहे आणि अपेक्षा देखील आहे. मला विश्वास आहे की ती अपेक्षा पूर्ण होईल. पण असा बदल केवळ शस्त्रांनी किंवा रागाने येत नाही. त्यामागील खरी शक्ती जवळीक आहे. जवळीक हीच समाजाला एकजूट ठेवते. कलियुगात, एकजूट राहणे ही आपली सर्वात मोठी ताकद आहे.

रामालाही रावणाचा वध करावा लागला

रावण एक शिवभक्त होता. त्याच्याकडे एका चांगल्या माणसाला आवश्यक सार्‍या गोष्टी होत्या पण जे शरीर, मन आणि बुद्धी त्याने धारण केलेली होती ते बदलायला तयार नव्हता. रावण जो पर्यंत हा देह सोडत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये बदल होणार नव्हता त्यामुळे रामाला रावणाचा वध करायला लागला.