Rs 30 lakh funded by Union Bank of India (PC - Twitter)

कोरोना विरोधातील लढ्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या (Union Bank of India) अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे 30 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. बँकेचे क्षेत्रीय सरव्यवस्थापक एम. व्यंकटेश यांनी आज मंत्रालयात मदतीचा डिमांड ड्राफ्ट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी बँकेचे सरव्यवस्थापक राजीव मिश्रा, मुंबईचे उप महाव्यवस्थापक अशोक दास उपस्थित होते.

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विरोधातील लढाईसाठी राज्य शासनाने उद्योजक, कलाकार आणि नागरिकांना आर्थिक निधी देण्याचे आवाहन केले आहे. यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. (हेही वाचा - वनहक्क कायदा दुरुस्ती संदर्भात राज्यपालांची अध‍िसूचना जारी; जिल्हास्तरीय समितीकडून नामंजूर वनहक्क दाव्यांसंदर्भात विभागीय समितीकडे अपील करता येणार)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजातील विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना कोरोना लढाईसाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे.