मनमाड: चालती ट्रेन पकडण्याच्या नादात गमावणारा होता जीव मात्र RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचले रेल्वे प्रवाशाचे प्राण, Watch Video
Manmad Railway Station (Photo Credits: ANI)

रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सांगूनही रेल्वे प्रवासी सर्रासपणे चालती रेल्वे पकडणे किंवा चालत्या रेल्वेमधून उडी मारणे हे प्रकार करताना दिसतात. यात अनेकदा प्रवाशांना गंभीर दुखापत होते तर काहींना आपला जीवही गमवावा लागतो. अशीच एक घटना मनमाड स्थानकात (Manmad Railway Station) घडली. चालती एक्सप्रेस पकडण्याच्या नादात एक रेल्वे प्रवासी गाडी खाली आली असता स्टेशनवरील रेल्वे पोलीस कर्मचारी (RPF) मनिष कुमार सिंग (Manish Kumar Singh) यांच्य प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला. हा प्रवासी 15018 काशी एक्सप्रेस ही चालती गाडी पकडण्याच्या गडबडीत हा प्रकार घडला.

रेल्वे स्थानकात कित्येकदा सूचना देऊनही रेल्वे प्रवासी चालती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करत असतात. असाच प्रयत्न करणा-या एका रेल्वे प्रवाशाचे प्राण रेल्वे पोलीस मनिष सिंगमुळे वाचले.

ANI व्हिडिओ:

हा प्रवासी 16 सप्टेंबर रोजी मनमाड रेल्वे स्टेशनवरील फलाट क्र. 3 वरून सुटलेली 15018 काशी एक्सप्रेस पकडण्याचा प्रयत्न करत होता. त्याला काही कळायचा आत त्याचा गाडीत चढताना तोल गेला आणि रेल्वेखाली आला. त्यावेळी तेथे ऑनड्युटी असलेल्या रेल्वे पोलीस मनिष याने हा प्रकार पाहिला आणि क्षणाचाही विलंब न करता त्याने ताबडतोब त्याला फलाटावर खेचून घेतले. त्याच्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले. हेही वाचा- अहमदाबाद: 1 मिनिटांत 426 आरक्षित रेल्वे तिकिटांचे बुकिंग करणारा कोण आहे अवलिया, वाचा सविस्तर

मनिषच्या या कृत्यामुळे त्या रेल्वे प्रवाशाचे जीव तर वाचलाच शिवाय त्याला काही गंभीर दुखापतही झाली नाही. आपल्या मदतीसाठी धावून आलेल्या आणि आपले जीव वाचविणा-या मनिषचे प्रवाशाने आभार मानले.

हेही वाचा- ओडिशा मध्ये चालती ट्रेन पकडण्याच्या नादात या प्रवाशासोबत झाले असे काही, थरारक दृश्य सीसीटीव्हीत झाले कैद

सांगण्याची गोष्ट म्हणजे रोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. अशा वेळी सर्व प्रवाशांसाठी रेल्वे पोलीस त्या ठिकाणी हजर असतीलच असे नाही. म्हणून सावधानता बाळगत आपण चालती ट्रेन पकडणे किंवा चालत्या ट्रेनमधून उडी मारणे हे प्रकार थांबवले पाहिजे.