Mumbai : 2008 रोजी झालेल्या 26/11 च्या भयानक दहशतवादी हल्ल्याला यंदा 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच हा दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) इतका भयानक होता की त्याचा सहजासहजी विसर पडणे अशक्य गोष्ट आहे. मात्र तब्बल दहा वर्षांनी मुंबई पोलीस दलामधील बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात रोबोचा(Robot) समावेश करण्यात आला आहे. तसेच या रोबोच्या सहाय्याने बॉम्ब शोधण्यास मदत होणार असून तो निष्क्रियसुद्धा रोबोमार्फत केला जाणार आहे. त्यामुळे पोलिसांना या रोबोची मोलाची मदत लाभणार असून मोठा दिलासा मिळाला आहे.
बॉम्ब शोधणे ते निष्क्रिय करणाऱ्या कार्यासाठी आत्याधुनिक पद्धतीचा एक रोबो बनविण्यात आला आहे. तसेच या रोबोला 'मिनी रिमोटली व्हेव्हिकल' (MROV) असे नाव देण्यात आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या रोबोचा पोलीस दलात समावेश करावा अशी मागणी केली जात होती. तर मुख्य बाब म्हणजे हा रोबो भारतामध्येच बनविण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलिसांची ताकद वाढली असून हा रोबो पावसाळ्यातही आपले कार्य करणार आहे.
या रोबोची किंमत जवळजवळ 84 लाख रुपये इतकी आहे. तर 100 किलो एवढे रोबोचे वजन असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा रोबो रिमोटच्या सहाय्याने चालणार असून 45 डिग्री उंच पर्वत, विमानाच्या पायऱ्या आणि रेल्वे स्थानकावरील पायऱ्या अगदी चढू शकणार आहे. म्हणूनच रिमोटच्या सहाय्याने हा रोबो चालणार असून कोणतीही मानवहानी होणार नाही याची दक्षता घेतली गेली आहे.