Acid Attack in Malad: मुंबईतील मालाड या भागातील मालवणी(Malvani) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर अॅसिड (Acid Attack) फेकले. या घटनेनंतर पोलिसांनी 34 वर्षीय व्यक्तीस अटक केले आले आहे. शाबीर खान असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- भोपाळमधील फ्लॅटमध्ये पाच वर्षांच्या मुलीचा सापडला मृतदेह, बलात्कारकरून हत्येचा संशय, तिघांना अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, यास्मीन खान असं पीडित महिलेचे नाव आहे. अॅसिड हल्ल्यात यास्मीन खान जखमी झाली. जखमी पीडिलेत कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सद्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन आरोपी पतीला अटक केले.
शाबीर खान हा बेरोजगार होता. दारू आणि ड्रग्जचे सेवन करत असल्याने यास्मीनला राग यायचा. यास्मीनला शाबीर याचं दुसऱ्या महिलेच्या प्रेमात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तीनं नवऱ्यासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यास्मीन काही महिन्यांपासून आपल्या आईकडे राहण्यासाठी आली. तेव्हा बुधवारी शाबीर दारूच्या नशेत असताना यास्मीनच्या घरी गेला.
रागाच्या भरात घरात घुसून यास्मीनच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकला आणि घटनास्थळावरून फरार झाला. फरार होण्याअगोदर शाबीरने पत्नी आणि तीच्या भावाचा फोन जप्त करून घेतला. हल्ल्यात यास्मीन गंभीर जखमी झाली. तिच्या आईने तीला तात्काळ कुपर रुग्णालयात नेले. तेथे सद्या तिच्यावर उपचार सुरु केले आहे.
मालवणी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, आरोपीविरुधात गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 124(2), 311, 333 आणि 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही.