प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

आज नवीन वर्ष २०२३ वर्षाचा दुसरा दिवसा दिवस. पण महाराष्ट्रात २०२३ या नव्या वर्षाची सुरुवात डॉक्टरांच्या संपाने झाली आहे. एका बाजूला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगातील विविध देशात उच्छाद मांडला आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतावरही कोरोनाचं संकट घोंगावत आहे. किंबहुना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून या संबंधीत सुचना देण्यात आल्या असुन देशभरात खबरदारी बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तरी महाराष्ट्रात मात्र आरोग्य सेवेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण राज्यातील निवासी डॉक्टरांनी आजपासून संपाची हाक दिली आहे. तरी राज्यभरातील शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर या संपात सहभागी होण्याने शासकीय रुग्णालयातील उपाचार घेणार असणाऱ्या रुग्णापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्यात सर्वसामान्य परिस्थिती तसेच तळहातावर पोट असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे डॉक्टरांचा हा संप सरकारविरोधी असला तरी या संपाचा फटका मात्र सर्व सामान्यांना बसणार आहे.

 

जाणून घ्या काय आहेत निवासी डॉक्टरांच्या मागण्या:-

  • सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन द्यावे
  • तत्काळ महागाई भत्ता देवू करावा
  • सहाय्यक आणि सहयोगी प्राध्यापकांची पदभरती
  • डॉक्टर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहांची सुधारणा
  • वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वाढीव 1 हजार 432 जागांची पदनिर्मिती

(हे ही वाचा:- Mumbai Health Centres: मुंबईमध्ये 26 जानेवारीपर्यंत सुरु होणार 100 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे केंद्रे; गरिबांना मिळणार स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य सेवा)

 

कोरोनाचा नवा व्हेरिऐंट दारावर असताना राज्यातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे राज्यभरातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. निवासी डॉक्टरांच्या कित्येक दिवसांपासून काही विशेष मागण्या आहेत.  राज्यात नुकसतचं  हिवाळी अधिवेशन पार पडलं आहे. तरी निवासी डॉक्टरांच्या मागण्या मात्र अजूनही पुर्ण झाल्या नाहीत. म्हणुन राज्यातील निवासी डॉक्टरांनी आजपासून संप पुकारल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यापूर्वी राज्य सरकारच्या मंत्र्यांसोबत अनेक वेळेस बैठका पार पडल्या पण त्यातून आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. तसेच निवासी डॉक्टरांची कुठलीही मागणी पूर्ण करण्यात आले नाही. किंबहुना डॉक्टरांच्या मागण्यांना सरकराकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे.