जगातील विविध देशात कोरोना विषाणुने पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. त्याच पार्श्वभुमिवर भारत सरकारकडून देखील खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. किंबहुना आरोग्य मंत्रालयाकडून तर प्राथमिक मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. एवढचं नाही तर काही गर्दीच्या ठिकाणी कोरोना निर्बंध लागू करण्यात येण्याची शक्यता देखील दर्शवण्यात आली आहे. तसेच देशातील विविध राज्यांना कोरोना विषयक विशेष सुचना दिल्या गेल्या आहेत. पण कोरोनाचा नवा व्हेरिऐंट दारावर असताना राज्यातील निवासी डॉक्टर संपावार जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किंबहुना निवासी डॉक्टर संघटनांकडून यासंबंधी इशाराचं देण्यात आला आहे. निवासी डॉक्टरांच्या कित्येक दिवसांपासून काही विशेष मागण्या आहेत. राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. तरी निवासी डॉक्टरांच्या मागण्या मात्र अजूनही पुर्ण झाल्या नाहीत. म्हणुन राज्यातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारण्याचा इशारा दिला आहे.
येत्या २ जानेवारी पासून राज्यातील निवासी डॉक्टर संप पुकारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी राज्य सरकारच्या मंत्र्यांसोबत अनेक वेळेस बैठका पार पडल्या पण त्यातून आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. तसेच निवासी डॉक्टरांची कुठलीही मागणी पूर्ण करण्यात आले नाही. किंबहुना डॉक्टरांच्या मागण्यांना सरकराकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने निवासी डॉक्टरांनी संप पुकारल्याचा इशारा दिला आहे. (हे ही वाचा:- Corona In Maharashtra: कोरोनाचा नवा व्हेरिऐंट BF7 महाराष्ट्रात नाही, राज्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची महत्वपूर्ण माहिती)
जाणून घ्या काय आहेत निवासी डॉक्टरांच्या मागण्या:-
- सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन द्यावे
- तत्काळ महागाई भत्ता देवू करावा
- सहाय्यक आणि सहयोगी प्राध्यापकांची पदभरती
- डॉक्टर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहांची सुधारणा
- वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वाढीव 1 हजार 432 जागांची पदनिर्मिती