प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

बँकांचे घोटाळे (Bank Scam), बँकेमध्ये घडलेल्या अफरातफरी यांसारख्या घटना एकामागून एक समोर येत आहेत. महाराष्ट्रातील पीएमसी (PMC Bank) बँक घोटाळ्यामध्ये तर शेकडो खातेदार अडकले आहेत. आता रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील अजून दोन बँकांवर कारवाई केली आहे. पुणे येथील जनता सहकारी बँक (Janata Sahakari Bank Ltd) आणि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक (Jalgaon Peoples Co-operative Bank) अशा दोन बँकांना अनुक्रमे 1 कोटी व 25 लाख असा दंड ठोठावण्यात आला आहे. या बँकांवर आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआयने या बँकांविरुद्ध कारवाई केली आहे.

उत्पन्नाची पुष्टी, आगाऊ व्यवस्थापन व मालमत्ता वर्गीकरण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल केंद्रीय बँकेने पुणेस्थित जनता सहकारी बँकेला 1 कोटी रुपये आणि जळगाव पीपुल्स कोऑपरेटिव बँकेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. (हेही वाचा: NEFT सुविधेच्या माध्यमातून आता 24 तास पाठवता येणार पैसे, RBI कडून सामान्यांना दिलासा)

यापूर्वी सोमवारी आरबीआयने तमिळनाडू मर्केंटाईल बँकेलाही 35 लाखांचा दंड ठोठावला आहे. वर्गीकरण आणि फसवणूकीच्या नियमांचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्यामुळे हा दंड बँक ठोठावला गेला. अशा प्रकारे या बंकाविरुद्ध झालेली ही कारवाई आताच्या सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक मानली जाते. केंद्रीय बँकेने मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या संदर्भात ही माहिती दिली आहे.