'कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा करा' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई येथील विमानतळ आणि रेल्वे स्थानकाच्या नावात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj University) यांचा संपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर कोल्हापूर (Kolhapur) येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करुन छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया ताबडतोब सरु करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांचा योग्य मान- सन्मान राखणे गरजेचे आहे. म्हणूनच त्यांचा एकेरी उल्लेख टाळणे अतिशय गरजचेचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे अराध्य दैवत आहेत. त्यांचा एकेरी उल्लेख करणे टाळले पाहिजे. महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे. यामुळेच कोल्हापूर येथे असलेल्या शिवाजी विद्यापीठचा नामविस्तार करुन त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे संपूर्ण नाव देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. केवळ शिवाजी महाराजच नव्हे तर, राज्याच्या सर्व आदरणीय महापुरुषांच्या एकेरी नावाने असणाऱ्या शासकीय योजना, कार्यक्रम आणि ठिकाणे यांचाही नामविस्तार केला पाहिजे, अशी इच्छा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. मात्र, यावर भगसिंह कोश्यारी काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे देखील वाचा-महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीत घेतला निर्णय

एएनआयचे ट्विट-

दरम्यान, जोतिबा फुले असे न म्हणता महात्मा जोतिराव फुले, संभाजी ऐवजी छत्रपती संभाजी महाराज असे नामविस्तार करून या महापुरुषांचा योग्य तो गौरव करावा, या दृष्टीने संबंधित विभागांनी कार्यवाही हाती घ्यावी, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.