महाराष्ट्र- कर्नाटक (Maharashtra-Karnataka) सीमा प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालयात बैठक पार पडली आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमा गंभीर असून सर्वोच्च न्यायालायात या विषयावर तातडीने सुनावणी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला राज्याचे मंत्री तसेच महाअधिवक्ता उपस्थित होते.

महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शनिवारी मंत्रालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, मुख्य सचिव अयोज मेहता तसेच महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासह राज्याच्या विधी आणि न्याय विभागाचे वरिष्ठ विधी सल्लागार उपस्थित होते.

एएनआयचे ट्विट-

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्यावर भर दिली आहे.  आरे येथील कामाला स्थगिती दिल्यानंतर त्यांनी नाणार प्रकल्पही थांबवला आहे. जर उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक- महाराष्ट्र निर्णय मार्गी लागला तर हा सर्वात मोठा निर्णय मानला जाईल.