Bombay High Court (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) या दोन जिल्ह्यांचं नामांतर करण्याचा निर्णय झाला. केंद्र सरकार कडून देखील त्याला मंजुरी देण्यात आली परंतू काहींनी या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यासाठी अनेक याचिका दाखल करण्यात आला. आता या नामांतराच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये 4,5 ऑक्टोबर दिवशी अंतिम सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर त्याची सुनावणी केली जाणार आहे.

महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये औरंगाबाद, उस्मानाबादचं नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस यांच्या महायुतीच्या सरकारने त्यांचा निर्णय रद्द करून नव्याने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव केले होते.

सध्या कोर्टात नामांतराला आव्हान दिले असल्याने कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आहेत. आता अंतिम सुनावणी मध्ये औरंगाबादच्या नामांतराचा फैसला 4 ऑक्टोबर आणि उस्मानाबादच्या नामांतराचा फैसला 5 ऑक्टोबरला होणार आहे.

औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी 4 जुलै 2023 रोजी परिपत्रक जारी करण्यात अंतिम निर्णयापर्यंत औरंगाबादचा उल्लेख छत्रपती संभाजी नगर न करण्याचे आदेश दिले होते. शहराच्या नामांतराबाबत मुंबई उच्च याचिकांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या मुख्य पीठात प्रलंबित शासनाच्या वतीने 20 एप्रिल 2023 रोजी करण्यात आलेले निवदेन तसेच 3 मे 2023 रोजीच्या न्यायालयीन आदेशाच्या अनुषंगाने पाण्डेय यांनी हे आदेश काढले आहेत. त्यामुळे यापुढे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात औरंगाबाद असाच उल्लेख करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.