महाराष्ट्रात शॉपिंग मॉल, हॉटेल्स, सलून, ब्युटी पार्लर राहणार बंद; राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन सुरु होते. परंतु, केंद्र सरकारने शनिवारी अनलॉकडाउनच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून शनिवारी मार्गदर्शकतत्वे जाहीर करण्यात आली आहेत. दरम्यान, आठ जूनपासून प्रार्थनास्थळे, हॉटेल, मॉल सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही आपली मार्गदर्शकतत्वे (Maharashtra Govt Guidelines) जारी केली आहेत. या मार्गदर्शकतत्वानुसार राज्यात धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाईची दुकाने, स्पा, सलून आणि ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत.

केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता संपूर्ण राज्यात 30 जूनपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हे करत असताना नवी सुरूवात करण्यासाठी ठाकरे सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ हे नवे धोरणही राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. हे देखील वाचा- Maharashtra Govt Guidelines #Unlock1: महाराष्ट्रात येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार, पहा कोणत्या गोष्टींसाठी सरकारने दिली परवानगी

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.