Ghatkopar Hoarding Collapse Case प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य -X/@ss_suryawanshi)

Ghatkopar Hoarding Collapse Case: मुंबईतील घाटकोपर होर्डिंग कोसळून (Ghatkopar Hoarding Collapse) 17 जणांचा बळी घेणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपी, जाहिरात फर्मचे संचालक भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) यांना शनिवारी, 20 ऑक्टोबर रोजी मुंबई न्यायालयाने (Mumbai Court) जामीन मंजूर केला. भिंडे यांचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही एम पठाडे यांनी मंजूर केला.

भिंडे यांनी त्यांचे वकील सना खान यांच्यामार्फत ही दुर्दैवी घटना म्हणजे 'देवाचे कृत्य' असल्याचा दावा केला होता. तसेच राजकीय सूडबुद्धीने त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचे वकीलाने म्हटले होते. उपनगरीय घाटकोपर परिसरात लावलेले होर्डिंग अनपेक्षित, असामान्य वाऱ्याच्या वेगामुळे कोसळले. त्यामुळे यात भावेश भिंडे यांची कोणतीही चूक नाही, असा युक्तिवाद खान यांनी केला. (हेही वाचा -Ghatkopar Hoarding Collapse: 'घाटकोपर होर्डिंगचा पाया कमकुवत होता, वाऱ्याचा वेग सहन करण्याची क्षमता नव्हती'; VJTI च्या अहवालात समोर आली धक्कादायक माहिती)

भिंडे हे महाकाय होर्डिंग बसवण्याच्या वेळी फर्मचे संचालक नव्हते, असा दावाही खान यांनी केला. भिंडे यांच्यावर 'निर्दोष हत्या' असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खटल्यात भिंडे यांचा सक्रिय सहभाग असल्याचे दाखवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे सांगत फिर्यादी पक्षाने त्यांना जामीन देण्यास विरोध केला. (हेही वाचा - Ghatkopar Hoarding Collapse Accident: मुंबईमध्ये नवीन होर्डिंग लावण्याची परवानगी दिली जाणार नाही; घाटकोपर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय)

घाटकोपर येथील होर्डिंग कोसळतानाचा व्हिडिओ - 

दरम्यान, 13 मे रोजी अचानक वारा आणि अवकाळी पावसात पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याने मुंबई विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलचे माजी महाव्यवस्थापक आणि त्यांच्या पत्नीसह तब्बल 17 जणांचा मृत्यू झाला होता. रेल्वेच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे हे होर्डिंग लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.