Thane Crime: ठाण्यामध्ये अन्न आणि मुक्काम देण्यास नाकारल्याने नेपाळमधील रहिवाशांमध्ये जोरदार भांडण, एका व्यक्तीने रागाच्या भरात चाकुचे वार करत आतडे काढले बाहेर
Representational Image | (Photo Credits: PTI)

ठाण्यात (Thane) नेपाळमधील (Nepal) दोन रहिवाशांमध्ये झालेल्या लढाईत एकीने भाजीपाल्याच्या कटरने दुसऱ्या महिलेवर वार केले आहेत. हे वार इतके भयानक होते की आरोपीने त्या महिलेच्या शरीराचा एक भाग बाहेर काढला. याबाबत स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर ठाणेनगर पोलिसांनी (Thane Police) आरोपीला तात्काळ अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी खारकर आळी (Kharkar Aali) परिसरातील नीलम सहकारी गृहनिर्माण संस्थेत घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यामध्ये तो रेकॉर्ड करणारा एक माणूस आरोपीला विचारत आहे, काय झाले आणि तुमच्या शरीरावर रक्ताचे डाग का?

ती व्यक्ती स्पष्टपणे सांगू शकली नाही. मात्र अचानक एक जखमी हातात आतडे घेऊन चालत बाहेर आला. ते पाहून व्हिडीओ काढणारा व्यक्ती स्तब्ध झाला. त्यांने जखमीला रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षावाल्याला थांबवले. ठाणे नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे नाव पद्मा बहादूर थापोला असे आहे. ती नीलम सीएचएस येथे कुटुंबासह राहते आणि तिथे वॉचमन म्हणून काम करते. हेही वाचा  Thane Crime: ठाणेमध्ये मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीचा शुल्लक कारणावरून हॉटेल मालकावर चाकूहल्ला, एकास अटक

शुक्रवारी सायंकाळी 4 च्या सुमारास आरोपी इंद्रमोहन भरमूले बुडा यांनी थापोलाच्या घरी भेट दिली आणि त्याला त्याच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यास सांगितले. ठाणे नगर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी मुक्काम, नोकरी आणि जेवणाच्या शोधात होता आणि त्याने थापोला मदत मागितली.

थापोला नकार देताच चिडलेल्या बुडाने थापोलाच्या पोटावर अशा प्रकारे वार केले की थापोलाची आतडे बाहेर आली. त्याला तातडीने कळवा रुग्णालयात नेण्यात आले आणि तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिची प्रकृती गंभीर आहे. आयपीसी कलम 307 अंतर्गत आरोपीला ताबडतोब अटक करण्यात आली आहे.