Maharshtra Rain Alert: राज्यात सर्वदूर पाऊस पडत (Maharshtra Rain)आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली आहे. पुढील 48 तास राज्यात मुसळधार पावसाची स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने(Maharashtra Weather) व्यक्त केला आहे. जून महिन्यात राज्यात पावसाने दडी मारल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. खरीप पिकांना जीवनदान मिळाले आहे. काही ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. (हेही वाचा:Mumbai Weather Forecast Today: मुंबईत आज पावसाचा यलो अलर्ट, शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा )
रायगड, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस
आयएमडीच्या अंदाजानुसार, आज कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. रायगड, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याला रेड अलर्ट (IMD Rain Alert) देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहदनगर तसेच पुण्यासह किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पश्चिम घाटत पावसाचे प्रमाण जास्त राहू शकते. त्यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.(हेही वाचा: Mumbai Local Train Accident: मध्य रेल्वेच्या माटुंगा स्टेशन वर मोटारमॅन च्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ (Watch Video))
राज्यात पावसाची कशी स्थिती?
आज बुधवारी नंदूरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रायगड आणि सातारा येथे रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/CQuKIbEv16
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 23, 2024
राज्यात सरासरी किती टक्के पाऊस?
राज्यात सरासरीच्या 123 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्व धरणांमध्ये 39.17 टक्के पाणीसाठा जमा झालाय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 53.12टक्के इतका पाणीसाठा आहे. औरंगाबाद विभागात सर्वात कमी म्हणजे 12.13 टक्के पाणीसाठा आहे. तर नाशिक विभागात तो 28.34 टक्के पाणीसाठा आहे. चिंताजनक बाब म्हणजे, राज्यातील 1 हजार 21 गावे आणि 2 हजार 518 वाड्यांमध्ये अजूनही एक हजार 365 टँकर्सद्धारे पाणीपुरवठा सुरू आहे.
शुक्रवारपासून मात्र पावसाचा जोर (Maharashtra Weather Update) ओसरण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस उघडीप घेऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.