Mumbai Rain | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामान विभागाने (IMD) 24 जुलै रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. IMD ने बुधवारी शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअस ते 24 अंश सेल्सिअस राहील,' असे हवामान विभागाने सांगितले. शनिवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईत वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसाचे पाणी साचल्यामुळे काहीठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे.(हेही वाचा: Earthquake in Sangli: चांदोली धरण परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असताना धरणीकंप)

पोस्ट पहा

मुंबईत पावसामुळे अनेक ठिकठिकाणी पडझडीच्या घटना पहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी म्हाडाच्या इमारतीचा काही भाग कोसळला होता. त्यात एका महिलेला जीव गमवावाव लागला होता. त्यानंतर काल एका घराचा काही भाग कोसळला. आज माटुंगा येथे रेल्वे ट्रेक जवळील घराचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे रेल्वे रुळांवर बांबू पडला होता. मोटमनने वेळीच रेल्वे थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. (हेही वाचा:Maharashtra Rain Update: शुक्रवारपासून राज्यातील किनारपट्टीवरील पाऊस कमी होण्याचा अंदाज)

शुक्रवारपासून मात्र पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, आज कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. रायगड, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहदनगर तसेच पुण्यासह किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पश्चिम घाटत पावसाचे प्रमाण जास्त राहू शकते. त्यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलंय.