Marine Drive | (Photo Credits-ANI)

Mumbai High Tide Timing Today: आयएनएसने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या समुद्रात आज 26 मे रोजी सकाळी 11:24 वाजता 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची(High Tide) शक्यता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून मुंबईच्या जुहू बीचवर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. सध्या पश्चिम उपनगरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरांसाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट (Mumbai Rain Red Alert) जारी करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) अरबी समुद्रात उंच लाटा उसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. बिघडत्या हवामान परिस्थितीमुळे नागरिकांना किनारपट्टीपासून दूर राहण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

लोकल सेवेवर परिणाम

सततच्या पावसाने दृश्यमानता कमी झाल्यामुळे मुंबई लोकलचा वेग मंदावला. उपनगरीय गाड्या सुमारे 8-10 मिनिटे उशिराने धावत आहेत. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईतील अनेक उपनगरीय भागात रेड अलर्ट जारी केला आहे. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार (Heavy Rain) पावसानंतर सोमवारी पहाटेही पावसाने जोरदार हजेरी लावली. शहराच्या अनेक भागात पाणी साचले आहे. ज्यामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबईतील काही  भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बोरिवली, सांताक्रूझ, पवई, मुलुंड, चेंबूर, वरळी, कुलाबा आणि अलिबाग. नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण येथे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. नॉवकास्टच्या अंदाजानुसार, रायगड जिल्हा रेड अलर्ट अंतर्गत आहे. मुसळधार पाऊस आणि वाऱ्याचा वेग जास्तीत जास्त असण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट अंतर्गत आहे.