राज्य शासनाच्या विविध भागात रिक्त पदे भरण्यासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर 29 हजार पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामधील 13 हजार पदे ग्रामविकासाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर जलसंपदा विभाग आणि पोलीस दलातील 7 हजार पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 70 हजार पदांची मेगाभरती करणार असल्याची घोषणा केली होती. तर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात 1 लाख पदे रिक्त आहेत. परंतु आता आचार संहिता लागू होण्याअगोदर ग्रामविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभागासाठी पदे रिक्त असल्याने नोकरीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच राज्यात 80 हजार पदांची भरती करण्याचा निर्धार राज्य शासनाकडून करण्यात आला आहे. त्यामधील 35 हजार पदांची भरती पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे.
तर जलसंवर्धन विभागात 300, वन विभागा 2 हजार रक्षक, 960 ऑडिट सहाय्यक आणि निरीक्षक तसेच महसूल विभागात 1800 तलाठी पदांची भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या भरतीची विस्तारित माहिती शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर तसेच सरकारी पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली आहे.