Mumbai Metro: मुंबई मेट्रोमध्ये 27 पदांची भरती, दोन लाखांपर्यंत कमावण्याची मिळवा संधी
Representational Image (Photo Credits: File Photo)

मुंबई मेट्रो (Mumabi Metro) मध्ये जाॅब साठी संधी मिळत आहे. मुंबई रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMRCL) विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. सहाय्यक व्यवस्थापक ते कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता अशी पदे या भरती मोहिमेद्वारे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया काही काळ सुरू आहे. त्यामुळे तुम्हालाही जाॅबची गरज असल्यास उशीर करू नका आणि लवकरात लवकर अर्ज करा. MMRCL या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 27 पदांची भरती करणार आहे. महाराष्ट्रात सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2022 आहे.

कोणत्या पदावर होणार भरती

असिस्टंट जनरल मॅनेजर – 5 जागा

असिस्टंट मॅनेजर – 2 जागा

उप अभियंता – 2 जागा

कनिष्ठ पर्यवेक्षक – 2 जागा

कनिष्ठ अभियंता – 16 जागा

असिस्टंट (आयटी) – 1 जागा

असा करा अर्ज 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला महा मेट्रोच्या अधिकृत वेबसाइट mmrcl.com ला भेट द्यावी लागेल. अर्ज केल्यानंतर, सर्व आवश्यक कागदपत्रे या पत्त्यावर पाठवा – उपमहाव्यवस्थापक (HR), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, MMRCL-लाइन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई - 400051.

अर्ज कोण करु शकतात?

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ पदवी असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अजुन तपशीलवार जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना तपासणे चांगले होईल. प्रत्येक पोस्टसाठी वयोमर्यादा देखील भिन्न आहे जी सूचनांमधून पाहिली जाऊ शकते. (हे देखील वाचा: Mumbai Metro Update: मेट्रोमुळे मुंबईकरांना मिळणार दिलासा, यावर्षी पश्चिम उपनगरात अजून दोन मेट्रो मार्ग मिळणार)

किती मिळु शकते वेतन?

MMRCL च्या या पदांवर निवड झाल्यावर, उमेदवारांना पदानुसार वेतन देखील मिळेल. महिन्याला 34 हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत वेतन असू शकते.