Military Hospital Kirkee and Dehu Road Recruitment 2022: मिलिटरी हॉस्पिटल किरकी व देहू रोड येथे महिला सफाई कर्मचारी पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी उमेदवार महिला 10 वी उत्तीर्ण (10th passed jobs in Pune) असणे आवश्यक आहे. या जागांसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
महिला सफाई कर्मचारी पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता -
महिला सफाई कर्मचारी या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार 10 वी पास असावा. याशिवाय उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केललं असण आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (वाचा - SBI Recruitment 2022: एसबीआय मध्ये 48 पदांवर होतेय Assistant Managers पदांवर नोकरभरती; 25 फेब्रुवारी पर्यंत sbi.co.in वर करा अर्ज)
महिला सफाई कर्मचारी पदांसाठी पगार -
महिला सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या महिलेला 9,000 रुपये प्रतिमहिना पगार दिला जाईल.
उमेदवारांची निवड प्रक्रिया -
महिला सफाई कर्मचारी म्हणून अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत. त्यानंतर उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर निवडक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवाराच्या नोकरीची ठिकाण -
परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल किरकी, पुणे – 411020, तसेच परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल देहूरोड, छावणी, पुणे – 412201 हे असेल.
महिला सफाई कर्मचारी पदासाठी दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, बायोडेटा, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो ही कागदपत्रं आवश्यक असणार आहेत.
उमेदवारांनी या पत्त्यावर अर्ज पाठवावेत -
परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल किरकी, पुणे – 411020 किंवा परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल देहूरोड, छावणी, पुणे – 412201