Recruitment | (File Image)

2025: महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सध्या जोरदार चर्चेत आहे. ज्यामध्ये 18 ते 65 वर्षे वयोगटातील गरजू आणि पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये इतका निधी मदत म्हणून मिळतो. जी केवळ मदत म्हणून दिली जाते. पण याच महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना आणखी एक नवी संधी मिळणार आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने अंगणवाडी परिवेक्षका (Anganwadi Supervisor), मुख्य सेविका आणि मदतनीस (Anganwadi Helper) या पदांसाठी नोकर भरती (Anganwadi Bharti 2025) काढली आहे. प्राप्त माहतीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबतच्याआदेशावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या भरतीचा मार्ग मोकाळा झाला आहे. ही सर्व पदे येत्या 100 दिवसांमध्ये भरतील जातील असे सांगितले जात आहे. विविध जिल्ह्यांतील इच्छुक आणि पात्र महिलांना सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. संपूर्ण भरती आणि एकूण प्रक्रिया याबाबत घ्या जाणून.

शैक्षणिक पात्रता, नियम अटी आणि निक

महिला आणि बालविकास विभागाने रिक्त पदे भरण्यासाठी काढलेल्या अंगणवाडी परिवेक्षका, मुख्य सेविका आणि मदतनीस नोकर भरतीसाठी काही नियम अटी आणि पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

पदांची नावे: अंगणवाडी परिवेक्षका, मुख्य सेविका आणि मदतनीस

शैक्षणिक पात्रता: वरील सर्व पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमीत कमी 12 वी पास इतकी ठेवण्यात आली आहे. त्यासोबतच 2022 पासून मदतनीस असलेल्या इयत्ता 10 वी पास उमेदवारास थेट मुख्य सेविका पदावरही नियुक्त केले जाणार आहे. (हेही वाचा, Child Malnutrition In Maharashtra: महाराष्ट्रात मुलांच्या आहारात मोठी कमतरता, अनेक बालकांचे कुपोषण; नव्या अभ्यासात खुलासा)

अर्ज करण्याची पद्धत: इच्छुक व पात्र उमेदवारांना या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. त्यासाठी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या ठिकाणी विहीत नमुन्यात आणि कागदपत्रांसह हे अर्ज उमेदवारांनी दाखल करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा: या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी 18 वर्षांवरील आणि 35 वर्षांखाली वयोगटातील असवा.

उमेदवाराचा निवास: अर्ज करणारा उमेदवार हा तो ज्या ठिकाणी अर्ज करत आहे त्या संबंधित नगर परिषद, नगर पंचायत, नगर पालिका किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यासाठी निवासाचा पुरावा म्हणून त्यास हरिवासी दाखला द्यावा लागेल. जो पुरावा म्हणून पाहिला जाईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: अर्ज करण्याची अंतिम तारीख . फेब्रुवारी आहे.

दरम्यान, अलिकडी काही काळात राज्य आणि केंद्र सरकारने रखवडवलेल्या सरकारी भरती, ज्यामुळे रिक्त होत असलेली अधिकाधीक पदसंख्या आणि यंत्रणेवर येणारा ताण, त्यातून वाढणारी बेकारी, बेरोजगारी या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांसाठी ही नोकर भरती एक संधी ठरु शकते.