आरबीआय (RBI) कडून महाराष्ट्रातील अजून एका बॅंकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. काल जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, राज्यातील मलकापूर नागरी सहकारी बँकेच्या (Malkapur Urban Co-op Bank) ग्राहकांवर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. या सहकारी बॅंकेची आर्थिक स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे. मलकापूर नागरी सहकारी बँक कोणत्याही कर्जाचे नूतनीकरण करणार नाही सोबतच बॅंकेकेडून गुंतवणूक करण्यावर, दायित्व घेण्यावर तसेच आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही पेमेंट न करण्याचे सांगण्यात आले आहे.
आरबीआय कडून सध्या मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना दहा हजारांपेक्षा अधिक रूपये काढण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हा निर्णय सेव्हिंग तसेच चालू खाते असणार्या अशा दोन्ही ग्राहकांसाठी लागू असणार आहे. सर्व बचत बँक किंवा चालू खात्यांमधून किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेच्या 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. हे नियम पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नक्की वाचा: PMC बँक होणार USFB मध्ये विलीन; पीएमसीच्या ग्राहकांना 10 वर्षात मिळणार पूर्ण पैसे, RBI ने जाहीर केली ड्राफ्ट स्कीम .
.RBI ने मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर नो युवर कस्टमर (KYC) वर दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 2.00 लाखांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. अशाप्रकारे कारवाई झालेली ही पहिलीच नाही. यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक आणि गडहिंग्लज नागरी सहकारी बँक, अशा नागरी सहकारी बँकांवरही कारवाई करण्यात आली आहे.