पंजाब आणि महाराष्ट्र कॉ. बँक (PMC) घोटाळा प्रकरणी पुढील 6 महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहेत. ही बातमी जेव्हा या बँकेच्या खातेधारकांसमोर आली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमिनीच सरकली. यामुळे गेले काही दिवस हा मुद्दा अगदी चांगलाच तापला असून यातून मार्ग कसा काढता येणार असा प्रश्न खातेदारांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आरबीआयने पीएमसी खातेधारकांना दिलासा देत पुढील सहा महिन्यांसाठी 3,000 वरुन 10,000 रक्कम काढण्याची मुभा दिली होती. त्यानंतर त्यावर काही दिवसांनी म्हणजेच 3 ऑक्टोबरला ही रक्कम 25,000 पर्यंत केली. आता त्यात आणखी बदल ही रकम वाढवून 40,000 रुपये केली आहे.
रिझर्व्ह बँकेने ट्विट करत तसेच प्रेस नोट द्वारा ही बातमी दिली आहे.
Reserve Bank enhances withdrawal limit for depositors of Punjab and Maharashtra Cooperative Bank Ltd to ₹ 40,000/-https://t.co/tPJ77oOJB5
— ReserveBankOfIndia (@RBI) October 14, 2019
Banking Regulation Act, 1949 च्या अंतर्गत आरबीआयकडून पीएमसी बँकेवर कारवाई करण्यात आली होती. यामुळे खातेधारकांची प्रचंड गर्दी बँकेचा बाहेर दिसून आली होती. तसेच पीएमसी बॅंक कर्मचार्यांनी HDIL ग्रुपच्या मालकाच्या घरासमोर बसून आंदोलन केले आहे. तसेच PMC बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक (MD) जॉय थॉमस यांनादेखील पदावरून हटवण्यात आलं आहे. PMC Bank Crisis: पीएमसी बॅंक खातेदारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
पीएमसी बँक खाते धारकांना त्यांच्या खात्यामधून रक्कम काढण्यावर निर्बंध घालण्यात आल्याने संपात व्यक्त करण्यात आला. तसेच पीएमसी बँकेत खातेधारकांचे कोट्यावधीचे फंड अडकून पडल्याने पुढील व्यवहार कसे पुर्ण होणार हा सुद्धा प्रश्न उपस्थित राहिला होता. मात्र आता आरबीआयने खातेधारकांना दिलासा दिला असून 40 हजार रुपये काढता येणार असल्याचे सांगितले आहे.
तसेच हा घोटाळा मोठा असल्याने यावर तोडगा काढल्यास थोडा विलंब होत आहे असे सांगत खातेधारकांना घाबरून जाऊ नये, असा सल्लाही रिझर्व्ह बँकेने दिला आहे.