शिवजयंती (Shiv Jayanti) निमित्त शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह असतो. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंती निमित्त अनेक कलाकार आपल्या कलेतून महाराजांना अभिवादन करत असतात. दरवर्षी अशा अनेक कलाकृती आपल्याला पाहायला मिळतात. अनेक भव्य दिव्य कलाकृती विक्रमी ठरतात. मात्र यंदा रत्नागिरीच्या (Ratnagiri) एका तरुणाने जगातील सर्वात लहान रांगोळीतून शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली आहे. विलास रहाटे (Vilas Rahate) असं या तरुणाचं नाव असून तो रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील रहिवासी आहे. शिवाजी महाराजांची जगातील सर्वात लहान रांगोळी काढण्याचा विक्रम त्याने रचला आहे.
विलासच्या या कलाकृतीची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसह आणि सहा रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. तर या रांगोळीची गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. (Shiv Jayanti 2021: कडबा वापरुन अर्ध्या एकरात साकारली शिवप्रतिमा; सोलापूर येथील महाविद्यालयीन युवकांची कलात्मकता, पाहा VIDEO)
विलास रहाटे पोस्ट:
ही रांगोळी तीन बाय तीन सेंटीमीटर इतकी लहान असून यासाठी पाच ते सहा ग्रॅम रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. ही कलाकृती साकारण्यासाठी विलास गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत होता. तसंच ही रांगोळी काढण्यासाठी त्याला 42 मिनिटं 37 सेकंदाचा वेळ लागला आहे.