नऊ वर्षांच्या चिमूकलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करुन पीडितेचा मृतदेह सार्वजनिक शौचालयात टाकल्याची धक्कादायक घटना जुहू, मुंबई येथे घडली होती. याबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केली असता, देवेंद्र वड्डी (वय 35 वर्षे) या व्यक्तीचे नाव समोर आले. पोलिसांनी ताबडतोब या व्यक्तीला अटक केली. याबाबत चिडलेल्या पिडीतेच्या कुटुंबीयांनी आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. घडल्या प्रकारामुळे संतप्त जमावाने आरोपीला आमच्या तब्यात द्या अशी मागणीही पोलिसांकडे केली होती.
‘या आरोपीला फाशीची शिक्षा द्या, जो पर्यंत त्याचा मृत्य होणार नाही तोपर्यंत मी मुलीचे अंतिम क्रियाकर्म करणार नाही’, असे या पिडीतेच्या आईने सांगितले. गेले दोन दिवस पीडिता बेपत्ता होती. अखेर नेहरु नगर येथील सार्वजनिक शौचालयात पीडिेतेचा मृतदेह आढळून आला. त्याच संध्याकाळी या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली होती. (हेही वाचा: जुहू परिसरात 9 वर्षांच्या चिमुकलीची बलात्कार करुन हत्या)
पोलिसांनी जेव्हा तपासणी सुरु केली, तेव्हा सीसीटीव्हीमध्ये देवेंद्र त्या मुलीला आपल्या घरी घेऊन जात असताना दिसून आला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला, आणि तिला मारून टाकले. शेवटी रात्री 3 वाजता त्याने सार्वजनिक शौचालयात तिला फेकून दिले. देवेंद्र हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक वेळा गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. आता देवेंद्रला या प्रकरणात अडकवल्याबद्दल देवेंद्रच्या कुटुंबीयांनी पिडीतेच्या कुटुंबाला त्रास देण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, आता पोलिसांनी देवेंद्रच्या कुटुंबियांनाही अटक केली आहे. पोलीस देवेंद्रच्या घरी तपासणी आणि पंचनाम्यासाठी गेले असता, त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना रॉडने मारण्याची धमकी दिली. तसेच घटनास्थळाची तपासणीही करू दिली नाही. याबाबत पोलिसांनी कारवाई करत चौघांना अटक केली आहे.