डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोटार वाहतूक विभागात (Motor Transport Department) कार्यरत आठ महिला कॉन्स्टेबलवर अत्याचाराच्या आरोपांची माहिती देणारे पत्र प्राप्त झाले होते. या पत्रात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार, लिंगभेद आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे पत्र शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. महाराष्ट्र महिला आयोगाच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांनी गुरुवारी या पत्राची दखल घेतली आणि महिला समितीने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिल्याची माहिती X ला दिली.
याबाबत रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘मुंबई पोलीसांच्या मोटार परिवहन विभागातील महिला पोलीसांनी त्यांचा वरिष्ठ पोलीसांकडून लैंगिक छळ होत असल्याची तक्रार पत्राद्वारे केल्याचे विविध माध्यमांतून समोर आले आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून पोलीस आयुक्त, मुंबई यांना या प्रकरणाची सत्यता पडताळून वस्तुस्थितीदर्शक अहवाल तात्काळ पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.’
मुंबई यांना या प्रकरणाची सत्यता पडताळून वस्तुस्थितीदर्शक अहवाल तात्काळ पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.2/2
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 8, 2024
महिला आयोगाच्या प्रमुखांच्या पोस्टनंतर लगेचच, मुंबई पोलिसांनी यावर उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले आहे की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आहे आणि पत्रात दिलेली माहिती पूर्णपणे चुकीची आहे आणि हे काही बदमाशांचे षड्यंत्र असल्याचे आढळले आहे.
याबाबत मुंबई पोलीस म्हणतात, ‘आदरणीय महोदया, सदर प्रकरणी आम्ही सखोल माहिती घेतली असता व तथाकथित अर्जदारांकडे चौकशी केली असता सदरचा अर्ज त्यांनी केला नसून त्यांचे नाव सही कोणीतरी अज्ञात माणसाने खोडसाळपणे वापर केल्याचे समजून आले आहे. सदरची माहिती ही पूर्णपणे चुकीची असून काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक सदरचे कृत्य केले असल्याचे समजून आले आहे.’
आदरणीय महोदया,
सदर प्रकरणी आम्ही सखोल माहिती घेतली असता व तथाकथित अर्जदारांकडे चौकशी केली असता सदरचा अर्ज त्यांनी केला नसून त्यांचे नाव सही कोणीतरी अज्ञात माणसाने खोडसाळपणे वापर केल्याचे समजून आले आहे. सदरची माहिती ही पूर्णपणे चुकीची असून काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक सदरचे… https://t.co/PXPrGyd32S
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) January 8, 2024
ते पुढे म्हणतात, ‘सदर अर्जामध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे अशा प्रकारची कोणती घटना घडलेली नसून खोडसाळपणे अर्ज करणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत. याविषयी आम्ही अधिकारीक अहवाल आपल्या कार्यालयास सादर करीत आहोत.’ (हेही वाचा: धक्कादायक! 8 महिला हवालदारांनी DCP दर्जाच्या अधिकाऱ्यांवर केला बलात्काराचा आरोप; मुख्यमंत्री आणि आयुक्तांना लिहिले पत्र)
मुंबई पोलिसांच्या नागपाडा मोटार वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या आठ महिला पोलीस कॉन्स्टेबलचा तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. लैंगिक छळाचा सामना केल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.