रामदास कदम (Photo credit : Youtube)

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनचा (Shiv Sena) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) हे जादूटोणा करतात, ते बंगाली बाबांसोबत फिरतात असे गंभीर आरोप शिवसेनेचेच माजी आमदार सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांनी केला आहे. इतकेच नाही तर रामदास कदम यांनी आतापर्यंत चारवेळा पक्षाच्या विरोधात काम केले असल्याचे पुरावेही आपल्याकडे आहेत असा दावाही त्यांनी केला आहे. दळवी यांच्या या वक्यव्यामुळे राजकीय गोटात चांगलीच चर्चा सुरु आहे.

सूर्यकांत दळवी यांनी बोलताना, ‘रामदास कदम हे भगत आणि जादूटोणावाले आहेत. दर अमावस्येला विरोधी पक्ष नेते बनण्यासाठी ते भगतगिरी करायचे. हे प्रत्यक्ष माझ्या डोळ्यासमोर घडले आहे. मी याचा साक्षीदार आहे. ‘असे गंभीर आरोप केले आहेत. सोबतच रामदास कदम यांनी दापोली मतदारसंघात घोसखोरी करू नये असा सज्जड दमही दिला आहे. याबाबत बोलताना ‘ज्या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला, त्याच मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवावी’ असे सुर्यकांत दळवी म्हणाले आहेत. (हेही वाचा: Black Magic: सरकार वाचावे म्हणून जेडीएस करत आहे जादू टोना? जेष्ठ नेते लिंबू घेऊन फिरताना आढळले; भाजप चा आरोप)

भलेही आपण सध्या आमदार नसू मात्र आपल्या मतदारसंघात पक्षासाठी योग्य उमेदवार हवा असे त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर निलेश यांनीही शिवसेनेवर हल्लाबोल करत, ‘नुसते रामदास कदम नाही तर शिवसेनेचे आमदार उदय सामंत, सदानंद चव्हाण यांचेही हेच धंदे आहेत. या प्रत्येकाकडे भगत गॅंग आहे, जे दिवस रात्र उलट सुलट उद्योग करत असतात. यामुळेच महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा विकासापासून वंचित राहिला आणि विकासाच्या यादीत 23 व्या क्रमांकावर वर फेकला गेला.’ अशी टीका राणे यांनी केली आहे.