Ramdas Athawale | (Photo Credit - Twitter/ANI)

Cabinet Expansion: महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराच्या विचारात आहे. यासाठी चर्चा सुरू आहे. आता आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Republican Party of India) नेही स्वत:साठी मंत्रिपदाची मागणी केली आहे. बुधवारी रात्री मुंबईच्या बाहेरील आरपीआय कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित करताना पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सांगितलं की, त्यांनी महाराष्ट्रात पुढील मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या पक्षाला मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे.

रामदास आठवले यांनी सांगितलं की, त्यांनी योग्य मंचावर आपली मागणी मांडली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या दोन ते तीन आणि विधानसभेच्या 10-15 जागांवर आरपीआय (आठवले)ला तिकीट देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आपला पक्ष महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका शिवसेना-भाजप युतीसोबतच लढणार असल्याचेही आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. (हेही वाचा - Eknath Shinde Vs Devendra Fadnavis: 'भाजपने औकातीत रहावे', एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आमदारांकडून थेट इशारा)

गेल्या वर्षी 9 ऑगस्ट रोजी शिंदे फडणवीस सरकारमध्ये 18 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, नियमानुसार राज्यात सर्वाधिक 43 मंत्र्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळेच भाजप आणि शिवसेनेचे अनेक नेते मंत्रिमंडळ विस्ताराची आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो.

सध्या महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीमध्ये तणाव असल्याच्या बातम्या येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेते संजय राऊत यांनी दावा केला आहे की, भाजपने मुख्यमंत्री शिंदे यांना मंत्रिमंडळातून काही मंत्र्यांना वगळण्यास सांगितले आहे. याचे कारण या मंत्र्यांची खराब कार्यशैली असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 40 आमदार असून भाजपकडे 100 हून अधिक आमदार आहेत. त्याचवेळी मंत्रिपदावरून हटवलेला नेता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाऊ शकतो, अशी भीती शिवसेनेला आहे. त्याचवेळी आठवले यांनी मंत्रिपदाची मागणी केल्याने भाजप-शिवसेना युतीच्या अडचणीत वाढ झाली आहे.