बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अक्षय कुमार (Akshay Kumar) यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सिनेमे आणि शूटिंग बंद पाडण्याचा इशारा दिल्यानंतर विरोधकांनी नाना पटोले यांना चोख प्रत्त्युतर दिले आहे. त्यात आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देखील उडी घेतली आहे. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांना नाना पटोले यांनी अशी धमकी देणे योग्य नसल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
"माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वेळी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांनी तेलाच्या वाढलेल्या किंमतीचे ट्विट करुन निषेध व्यक्त केला होता. याचा अर्थ असा नाही की त्यांनी आजही या मुद्द्यावर बोलले पाहिजे. नाना पटोले यांनी अशी धमकी देणे योग्य नाही," असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तसंच काँग्रेसने त्यांच्या शूटिंगमध्ये काही व्यत्यय आणल्यास आम्ही कलाकारांच्या बाजूने असू असंही ते म्हणाले. ('सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ', नाना पटोले यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला)
ANI Tweet:
अक्षय कुमार और अमिताभ बच्चन ने पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह के वक्त तेल की बढ़ी कीमतों पर ट्वीट कर विरोध किया था। इसका मतलब यह नहीं है कि आज तेल की बढ़ी कीमतों पर भी वे ट्वीट करें। नाना पटोले की ऐसी धमकी देना अच्छी बात नहीं है: केंद्रीय मंत्री रामदास अठावले pic.twitter.com/LFs2NTup89
— ANI_HindiNews (@AHindinews) February 19, 2021
Congress' Nana Patole's threat to Akshay Kumar & Amitabh Bachchan for not tweeting against fuel price hike by Centre is not okay. My party is with them. If Congress threatens to disturb their shoot, we'll give them protection: MoS (Social Justice & Empowerment) R Athawale pic.twitter.com/TxNcSyqECR
— ANI (@ANI) February 19, 2021
काय म्हणाले होते नाना पटोले?
काँग्रेस सरकारच्या काळात मनमोहन सिंह पंतप्रधान असताना इंधन दरवाढीवरुन आक्रमक भूमिका घेणारे अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आता गप्प का? त्यावेळेस जसं लोकशाही मार्गाने ट्विटवरुन टीका करत होतात. त्याप्रमाणे आताही मोदी सरकारच्या अत्याचार आणि अन्यायाविरोधात भूमिका मांडा. अन्यथा तुमच्या सिनेमाचे शूटिंग किंवा प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणार नाही.
नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते राम कदम, अतुल भातखळकर, देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली होती.