Ram Karan Yadav (Photo Credit - Twitter/@Central_Railway)

General Manager Of Central Railway: मध्य रेल्वेचे नवीन महाव्यवस्थापक (General Manager Of Central Railway) म्हणून राम करण यादव (Ram Karan Yadav) यांनी 01 डिसेंबर 2023 रोजी पदभार स्वीकारला आहे. ते 1986 च्या परीक्षा बॅचचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनियर्स (IRSE) चे वरिष्ठ अधिकारी आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी ते इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग (IRICEN), पुणे येथे महासंचालक म्हणून कार्यरत होते. नरेश ललवानी यांच्यानंतर त्यांनी हा पदभार स्विकारला आहे.

यादव यांनी 1985 मध्ये आयआयटी रुरकी येथून ऑनर्ससह बीई (सिव्हिल) केले. त्यांनी 1987 मध्ये आयआयटी दिल्लीतून एम.टेक (सॉइल मेकॅनिक्स आणि फाउंडेशन इंजिनीअरिंग) केले. मार्च 1988 मध्ये ते रेल्वेमध्ये रुजू झाले. त्यांना पायाभूत सुविधा प्रकल्पांवर काम करण्याचा खूप समृद्ध आणि विपुल अनुभव आहे. त्यांनी पश्चिम रेल्वे, उत्तर पूर्व रेल्वे, मध्य रेल्वे, पूर्व रेल्वे, IRICEN पुणे, RITES आणि दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनवर काम केले आहे. (हेही वाचा - Mumbai Central Railway AC Local: मुंबई मध्य रेल्वेवर मुख्य मार्गावर 10 एसी लोकल धावणार)

तथापी, IRICEN, पुणे यांच्या महासंचालकपदाच्या कार्यकाळात त्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगच्या अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन आणि नियोजन केले. गट ब मध्ये प्रश्नपत्रिका तयार करणे, स्थापत्य अभियांत्रिकीच्या संहिता आणि नियमपुस्तिकेचे पुनरावृत्ती करणे आदी कामांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. (हेही वाचा - Central Railway In Action: मध्य रेल्वेत फुकट्यांचा सुळसुळाट; विनातिकीट 4438 प्रवाशांकडून एका दिवसात 16.85 लाख रुपये दंड वसूल)

दरम्यान, मध्य रेल्वेवर मुख्य प्रकल्प संचालक (स्टेशन डेव्हलपमेंट) म्हणून त्यांनी अजनी, नागपूर येथील इंटर मॉडेल स्टेशनच्या आराखड्याचा विकास आणि मंजुरी, घाटकोपर येथील मेट्रो स्टेशनसह स्टेशनचे एकत्रीकरण, ठाणे, कल्याण आणि सीएसएमटी मुंबई स्थानकांची पुनर्रचना आणि मुद्रीकरण यासारख्या कामांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका निभावली.