Dahi Handi In Ghatkopar By Ram Kadam Cancelled (Photo Credits: File Image)

कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर मागील अडीच महिन्यात कोणताही मोठा धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आलेला नाही, आताची परिस्थिती पाहता येत्या काळातही हे कार्यक्रम करण्यास परवानगी मिळेल अशी शक्यता कमीच आहे. गणेशोत्सवासारखा (Ganeshotsav) मोठा सण यंदा अगदी परंपरेपुरताच साजरा करण्याचा निर्णय आल्यानंतर आता ठिकठिकांणी दहीहंडी (Dahihandi)  सुद्धा रद्द करण्याचे निर्णय घेतले जात आहेत. मुंबईमधील मानाची आणि चर्चेतील मानली जाणारी घाटकोपरची (Ghatkopar) राम कदम (Ram Kadam) आयोजित दहीहंडी यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. याबाबत स्वतः कदम यांनी ट्विट करून माहिती दिली. Ganeshotsav 2020: गणेशोत्सव यंदा अत्यंत साधेपणाने; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना गणेश मंडळांना मान्य

दहीहंडीमुळे होणारी गर्दी यंदा जनहिताच्या दृष्टीने घातक ठरू शकते. त्यामुळेच यंदाची दहीहंडी रद्द करत आहोत असे राम कदम यांनी ट्विट करून स्पष्ट केले आहे. यंदा 12 ऑगस्ट रोजी दहीहंडी आहे, अद्याप अन्य मोठ्या मंडळांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी यंदा सेलिब्रेशन होणार नाही हे जवळपास निश्चित आहे.

Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांच्या संख्येत सर्वाधिक वाढ! 3752 नव्या रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची संख्या 1,20,504 वर

राम कदम ट्विट

दरवर्षी साधारणपणे श्रावणात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात अनेक सण येत असल्याने सर्वत्र धामधूम असते यंदा मात्र हे सण साजरे न करण्याच्या घोषणा होत असल्याने उत्साह मावळलेला दिसत आहे.