गेली जवळपास 30 वर्षे ग्रामपंचायत निवडणूक (Ralegan Siddhi Gram Panchayat Election) न झालेल्या जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांचे गाव असलेल्या राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीसाठी प्रथमच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अण्णा हजारे यांच्या विचारांचे समर्थन करणारे पॅनल विजयी झाले. (Gram Panchayat Elections Results 2021) त्यामुळे पुन्हा एकदा राळेगणसिद्धी ग्रामपंचाय कार्यालयात अण्णा हजारे यांचाच शब्द अंतीम ठरणार हे स्पष्ट झाले आहे. राळेगणसिद्धी येथे एकूण नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा हजारे समर्थक गटाला मिळाल्या आहेत. दरम्यान, विजय मिळाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जेसीबीवरुन मिरवणूक काढली. तसेच, डीजेही वाजवला. या वेळी नियमांचा भंग होत असल्याचे ध्यानात येताच पोलिसांनी मिरवणूक थांबवली व डीजे बंद केल्याचे समजते.
राळेगणसिद्धी गावात ग्रामपंचायत निवडणूक न घेता बिनविरोध निवड करण्याचे ठरले. परंतू, नंतर गावातील काही लोकांनी निवडणूक होऊ द्या अशी भूमिका घेतली. त्यामुळे गावात निवडणूक लागली. निवडणूक लागताच अण्णा हजारे यांचे स्वीय सहायक आणि इतर समर्थक मंडळींनी एकत्र येत ग्रामविकास पॅनल स्थापन केेल. या पॅनलने लढवलेल्या सर्वच्या सर्व जागा निवडूण आल्या. दरम्यान, ग्रामविकास पॅनल विरोधात उमेदवार उतलवलेल्या शामबाबा पॅनलचा पूर्णपणे पराभव झाल्या आहे. (हेही वाचा, Bhadli Budruk Gram Panchayat: भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत इतिहास घडला, तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील यांचा विजय)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेर येथील आमदार निलेश लंके यांनी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे अवाहन केले. लंके यांच्या अवाहनाला प्रतिसाद देणारी राळेगण ही पहिली ग्रामपंचायत होती. परंतू, पुढे गावकऱ्यांनी निर्णय बदलला. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही गावातील तरुणांना निवडणूक हवी असेल तर ती लढली पाहिजे. त्याशिवाय आम्हाल लोकशाही कळणार कशी, अशी प्रतिक्रिया दिली होती.