राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार बजावण्याच्या नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या शेवटच्या अपेक्षेवरही पाणी फिरले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नवाब मलिक यांनी नव्याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सुरु असलेल्या मतदानासाठी नवाब मलिक यांनी तात्पूरता जामीन एका मिळविण्यासाठी एक याचिका दाखल केली होती. न्यायालयाने तत्पुरत्या जामीनास नकार दिला. परंतू, मलिक यांना नव्या याचिकेद्वारे सुधारीत मुद्दे मांडण्यास न्यायालयाने परवानगी दिली. त्यानुसार मलिक यांनी नवी याचिका दाखल केली. मात्र या याचिकेवर सुनावणी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एक एक मत महत्त्वाचे मानले जात आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख सध्या कोठडीत आहेत. हे दोन्ही आमदार मतदानासाठी यावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकासआघाडीने जोरदार प्रयत्न केले. मात्र, त्याला यश येऊ शकले नाही. मतदानासाठी शिल्लख राहिलेला कालावधी पाहता मलिक आणि देशमुख यांना आता कोणत्याही न्यायालयाकत जाऊन दिलासा मिळवणे वेळेअभावी शक्य राहिले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची ही दोन्ही मते सध्या तरी अनुपस्थित राहिली आहेत. (हेही वाचा, Rajya Sabha Elections 2022: मविआला धक्का, नवाब मलिक यांना मुंबई हाय कोर्टात दिलासा नाही; अनिल देशमुख यांच्याबाबतही राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण)
राज्यसभा निवडणूक 2022 साठी मतदान सुरु आहे. सकाळी 9 वाजलेपासून सुरु मतदान सुरु आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. त्यामुळे नवी याचिका दाखल करुन ती कोर्टाने स्वीकारून त्यावर निर्णय देईपर्यंत किती काळ लागेल हे सांगणे कठिण आहे. त्यामुळे मलिक यांना तूर्तास तरी दिलासा मिळाला नाही. त्यांनी नवी याचिका दाखल केल्यानंतर काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अनिल देशमुख आणि नबाब मलिक या दोघांकडूनही विशेष पीएमएलए न्यायालयाकडे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जामीन मागण्यात आला होता. मात्र, जामीनाची मागणी सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यानंतर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे याचिका केली. त्यापैकी मलिक यांच्या याचिकेवर न्यायालयाने दिलासा न दिल्याचे समजते आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची याचिका काल फेटाळून लावली होती.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना दिलासा न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मताचे गणित बिघडले आहे. त्यामुळे महाविकासआघाडीतही काहीशी धुसपूस सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मलिक, देशमुख यांना दिलासा मिळत नाही हे पाहताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ऐनवेळी मतांचा कोटा वाढवून घेण्याची भूमिका घेतली. म्हणजे महाविकासआघाडीत उमेदवारांच्या मतदानासाठी मतांचा कोटा 42 ठरविण्यात आला असताना राष्ट्रवादीने तो अचानक 44 इतका केला. त्यामुळे महाविकासआघाडीमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या भूमिकेनंतर मग काँग्रेसनेही आपल्या मताचा कोटा 44 करण्याचे ठरवले. नंतर मग राष्ट्रवादीने पुन्हा मतांचा कोटा 42 केला आणि दुपारनंतर आढावा घेऊन योग्य ती भूमिका घेऊन असे म्हटल्याचे समजते. ता वाढली आहे.