Rajya Sabha Election 2022: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी संभाजीराजे वर्षा बंगल्यावर
Uddhav Thackeray, Chhatrapati Sambhajiraje | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati SambhajiRaje) वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहे. पाच जागेसांठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांकडे पुरेसे संख्याबळ आहे. मात्र उर्वरीत सहाव्या जागेसाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. नेमकी याच जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावा सांगितला आहे. या जागेवर आपण अपक्ष लढणार आहोत, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे या भेटीत काय चर्चा होते यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

पुणे येथील पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करतानाच संभाजी राजे यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी दावा सांगितला होता. तसेच, या जागेसाठी आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही किंवा कोणत्याही पक्षाच्या वतीने अर्ज दाखल करणार नाही. आपण आपला अर्ज अपक्ष म्हणूनच दाखल करु. त्यासाठी सर्व पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असेही त्यांनी म्हटले होते. त्यासाठी आपण सर्वच पक्षांशी चर्चा करणार आहोत असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले होते. (हेही वाचा, Sambhaji Raje Chhatrapati Establish Swarajya organization: संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून 'स्वराज्य' संघटनेची स्थापना; राज्यसभा अपक्ष लढविण्याचीही घोषणा)

सहाव्या जागेसाठी शिवसेनेने दावा केला असून आपण ती जागा लढवणार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शिवसेनेच्या दाव्याला अनुकुलता दर्शवली आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही संभाजीराजे यांना ऑफर दिली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. शिवसेना त्याबाबत विचार करेन असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा होते याबाबत उत्सुकता आहे.