राजेश टोपे (Photo Credits-ANI)

Rajesh Tope on COVID19 Vaccine:  देशासह राज्यात येत्या 16 जानेवारी पासून कोरोनाच्या लसीकरणाची मोहिम राबवली जाणार आहे. त्यानुसार पुण्यातील सीरिम इंस्टिट्युट यांनी तयार केलेल्या लसीचे डोस आता देशातील विविध ठिकाणी पाठवण्यास मंगळवार पासून सुरुवात झाली आहे. तर राज्यात लसीकरणाच्या मोहिमेसाठी जोरदार तयारी केली गेली आहे. परंतु लस ही पहिल्या टप्प्यात कोणाला दिली जाईल आणि कशी पद्धतीची आहे याबद्दल अधिक माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात कोरोना व्हायरसवरील लसीकरणाच्या वेळी 18 वर्षाखालील मुल, गर्भवती महिला आणि कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असलेल्या व्यक्तींना दिली जाणार नाही असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तर आरोग्य सेवेतील कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स यांना प्रथम लस दिली जाणार असल्याचे ही टोपे यांनी म्हटले आहे. परंतु कोरोनाचे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांना मात्र आता लस दिली जाणार नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.(Vaccine Certificate: कोविड 19 लस घेणार्‍यांना QR Code सह वॅक्सिन सर्टिफिकेट मिळणार; पहा कुठे होऊ शकतो त्याचा फायदा)

Tweet:

कोरोना व्हायरसची लस राज्यातील विविध लसीकरण केंद्रावर येत्या 16 जानेवारी पासून उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जवळजवळ आठ लाख लोकांची कोविन अॅपवर नोंदणी केली गेली आहे. परंतु लोकांच्या संख्येच्या तुलनेत कोरोनावरील लसीचे डोस कमी आल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. पण आज रात्री किंवा उद्या पर्यंत प्राप्त होईल असे ही टोपे यांनी म्हटले आहे.