Rajeev Satav| Photo Credits: Twitter/sbsdeshmukh

महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षाचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव (Rajeev Satav) यांच्यावर आज हिंगोली (Hingoli)  मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. काल (16 मे) राजीव सातव यांचे पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटल मध्ये निधन झाले. कोविड 19 वर मात केल्यानंतर त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला आणि यामध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर आज हिंगोलीमधील कळमनुरीत अंतिम संस्कार करण्यात आले आहे. Rajiv Satav यांना संसर्ग झालेला सायटोमॅजिलो विषाणू नेमका आहे तरी काय?, जाणून घ्या लक्षणे.

राजीव सातव यांच्या अंत्यसंस्काराला आज हिंगोलीमध्ये कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. राजीव सातव यांना अखेरचा निरोप देताना सार्‍यांनाच भावना आवरणं कठीण झाले होते. दरम्यान अंतिम संस्कारांपूर्वी राजीव सातव यांना शासकीय इतमामात अखेरची मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सातव कुटुंबीयांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.   (नक्की वाचा: काँग्रेस खासदार Rajiv Satav यांच्या निधनानंतर Rahul Gandhi झाले भावूक; सोशल मीडियावर 'या' शब्दांत वाहिली श्रद्धांजली).

राजीव सातव हे 2020 सालीच राज्यसभेचे खासदार झाले होते. राहुल गांधी यांचे ते अत्यंत विश्वासू होते. अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी ऐन उमेदीच्या काळात जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सकाळी 10.30 पर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी  ठेवण्यात आले होते.त्यानंतर पुढील विधींना सुरूवात झाली आणि राजीव सातव यांच्या पार्थिवावर रीतिनुसार, मंत्रोच्चार पठण करत अंतिम संस्कार करण्यात आले.