Mahadevrao Mahadik, Satej Patil | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या (Rajaram Sakhar Karkhana Election Result) निवडणुकीत पहिला गुलाल महाडिक गटाला मिळाला आहे. आमदार सतेज पाटील गटाचे सचिन पाटील यांचे तगडे आव्हान मोडीत काढत महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांनी विजय मिळवला आहे. महादेव महाडीक यांना 83 तर विरोधात असलेल्या पाटील यांना 44 मते मिळाली आहेत. काखान्याच्या एकूण नऊ पैकी सहा गटात महाडिक गटाची सरशी झाली आहे. महाडिक गटाचे सर्व उमेदवार सरासरी अडीच हजार मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणी अद्यापही सुरु आहे. सर्व मतमोजी पूर्ण झाल्यावर अंतीम निकाल जाहीर केला जाणार आहे.

निवडणू प्रक्रियेदरम्यान सतेज पाटील गटाचे तब्बल 29 उमेदवार अवैध ठरले. त्यामुळे पाटील विरुद्ध महाडिक अशा गटांमध्ये टोकाची इर्ष्या निर्माण झाली होती. काहीही करुन महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक यांच्याकडून कारखाना खेचायचाच अशा हेतूने विरोधकांनी कंबर कसली होती. मात्र, सभासधांनी उत्पादक गटाला झुकते माप दिले आहे. महादेव महाडीक यांनी विजयी गुलाल दिल्यावर आता अमल महाडीकही आघाडीवर आहेत. (हेही वाचा, Rajaram Sakhar Karkhana Election Result: श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक निकाल, महाडिक गट आघाडीवर)

कोल्हापूर शहरातील बावडा परिसरातील रमणमळा येथे असलेल्या महसूल कल्याण निधी सभागृहात मतमोजणी सुरु आहे. दोन फेऱ्यांमध्ये 29 टेबलांवर मतमोजणी सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात 30 ते 58 या केंद्रांची मतमोजणी पार पडणार आहे. सर्व गटांतील शेवटच्या काहीच फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे विजयाचा कल आता स्पष्ट झाला आहे. महाडिक गटात उत्साहाचे वातावरण आहे.

अनेक वर्षांनी श्री छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक पार पडत आहे. या आधी सन 2015 मध्ये निवडणूक पार पडली होती. ज्यात 90% मतदान पार पडले होते आणि सर्वच जागा महाडिक पॅनलने जिंकल्या होत्या. या वेळी निकाल काय लागतो हे स्पष्ट झाले असले तरी अंतिम निकालापर्यंत वाट पाहणे महत्त्वाचे आहे.