Election | (Representational Image)

पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कोल्हापूरातील (Kolhapur श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी (Chhatrapati Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Result) सुरु आहे. आज (25 एप्रिल) सकाळी नऊ वाजून 40 मिनिटांपासून प्रत्यक्ष सुरु झालेल्या या मतमोजणीत महाडिक गट आघाडीवर आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार मतमोजणीच्या पहिल्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यानुसार पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत महाडिक गटाने अनुक्रमे 700 आणि 800 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे निकालातील उत्कंटता शिगेला पोहोचली आहे.

सत्ताधारी महाडिक आघाडी विरुद्ध विरोधक असा सामना पाहायला मिळतो आहे. पहिल्या फेरीपासून अमल महाडिक आघाडीवर आहेत. हाती आलेली माहितीनुसार दुसऱ्या फेरीआखेर मतांची बलाबल खालीलप्रमाणे-

शिवाजी रामा पाटील- 3198 मते (उत्पादक गटातून सत्ताधारी गट)

सर्जेराव बाबुराव भंडारे- 3173 मते (उत्पादक गटातून सत्ताधारी गट)

अमल महादेवराव महाडिक- 3358 मते (उत्पादक गटातून सत्ताधारी गट)

शिवाजी ज्ञानू किबिले- 2261 मते (सतेज पाटील आघाडी)

दिलीप गणपतराव पाटील- 2328 मते (सतेज पाटील आघाडी)

अभिजीत सर्जेराव माने- 2184- मते (सतेज पाटील आघाडी)

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी वावडा येथील रमणमळा येथे असलेल्या महसूल कल्याण निधीच्या सभागृहात सुरु आहे. मतमोजणीची दोन फेऱ्या सुरु आहेत. एकूण 29 टेबलांवर मतमोजणी सुरु आहे. पहिल्या टप्प्यात 29 तर दुसऱ्या टप्प्यात पुढच्या 30 ते 58 या केंद्रांची मतमोजणिी पार पडले. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.