महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election) महायुतीसमोर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाला मोठं अपयश पहावं लागलं आहे. या निवडणूकीनंतर आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुंबई मध्ये ठाकरे गट आणि शिवसेना पक्षाचा मेळावा पार पडला आहे. विधानसभा निवडणूकांनंतर आता पालिका निवडणूकांकडे लक्ष लागले आहे. विधानसभेचा निकाल पाहून अनेकांना राज-उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं वाटत असताना आज ठाकरेंच्या मेळाव्यातील एका खास गोष्टीने अनेकांचे कान टवकारल्याचं चित्र बघायला मिळालं आहे.
ठाकरे गटाच्या मेळाव्यातील पोवाड्याने वेधलं लक्ष
आज अंधेरीच्या ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये मंचावर सादर झालेल्या पोवाड्यामध्ये राज-उद्धव यांच्या जोडीचा उल्लेख करण्यात आला होता. 'युतीला सत्तेवर घेऊन आला, राज-उद्धव होते साथीला... सिंहाचा वाटा उचलला जीर हा जी...' असा उल्लेख त्यामध्ये होता. शिवसेनेच्या मेळाव्यात पक्षाचा प्रवासाचं वर्णन करणारा हा पोवाडा होता. दरम्यान हा पोवाडा सादर झाला तेव्हा व्यासपीठावर फार कोणी नेते, उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते.
Raj Thackeray | Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात राज ठाकरेंच्या नावाचा वाजला पोवाडा#RajThackeray #UddhavThackeray #ndtvmarathi pic.twitter.com/zYzjAx9JxO
— NDTV Marathi (@NDTVMarathi) January 23, 2025
राज ठाकरेंनी शिवसेनेला राम राम ठोकल्यानंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी कौटुंबिक संबंध जपले आहेत मात्र राजकीय आखाड्यात ते कायमच एकमेकांसमोर ठाकले आहेत. पण आता पालिका निवडणूकीमध्ये काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे.