MNS 14th Anniversary: शिवसेनेमधून बाहेर पडत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आज राज ठाकरेंच्या मनसेला 14 वर्ष पूर्ण होत आहेत. दरम्यान काही महिन्यांपूर्वी मनसेने कात टाकत 'हिंदुत्त्व'च्या मुद्द्यावरून पक्षाची पुर्नबांधणी केली आहे. दरम्यान भगवा झेंडा त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवमुद्रा असा नवा झेंडा घेऊन ते जनतेसमोर आले. दरम्यान मनसेच्या या बदलानंतर आज मनसेचा पहिलाच वर्धपन दिन आहे. या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खास व्हिडिओच्या माध्यमातून मनसैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांच्या ट्विटर अकाऊंटवरून तो शेअर करण्यात आला आहे. मनसेच्या नव्या भगव्या झेंड्यासह अरूणोदयाच्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांना 14व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा असा संदेश लिहलेला व्हिडीओ राज ठाकरे यांनी शेअर केला आहे. मनसेच्या वर्धापन दिनी शॅडो कॅबिनेट जाहीर होण्याची शक्यता; नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांची नावे चर्चेत.
आज मनसेच्या 14व्या वर्धापनदिनाचं औचित्य साधत नवी मुंबई येथील वाशीमधील विष्णूदास भावे नाट्यगृहामध्ये सकाळी 10 च्या सुमारास मनसेच्या वर्धापनदिनाचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथे पार पडलेल्या मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये त्यांनी अमित ठाकरे या त्यांच्या मुलाला राजकारणामध्ये लॉन्च केले होते. आता ठाकरे सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी ते शॅडो कॅबिनेटची घोषणा करणार आहेत. त्यामुळे आज या मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा होणार का? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे ट्वीट
#महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना #वर्धापन_दिन #महाराष्ट्र_सैनिक pic.twitter.com/P9fL2dKmuI
— Raj Thackeray (@RajThackeray) March 9, 2020
नवी मुंबई आणि औरंगाबाद पालिकांमध्ये लवकरच निवडणूका पार पडणार आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने राज ठाकरे आज काय घोषणा करणार? मोर्चेबांधणी कशी असेल? भाजपाच्या वाढत्या जवळीकीचा फायदा ते या निवडणूकांमध्ये करून घेणार का? अशा अनेक गोष्टींबाबत मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.