लोकसभा निवडणूकीचे (Lok Sabha Election) पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. यंदा देशात सात आणि महाराष्ट्रात चार टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्रात युती आणि आघाडीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) काय निर्णय घेणार? याकडे मराठी माणसाचं लक्ष लागलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी एका पत्रकाद्वारा मनसे लोकसभा 2019 निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूकीतून माघार घेतल्यानंतर मनसे कोणती भुमिका घेणार हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. मात्र आज त्याचं उत्तर देत देशाला मोदी, शहा यांच्यापासून मुक्त करा असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. Lok Sabha Election 2019 Dates: मुंबई, पुणे, नाशिक, कोकण मध्ये कधी आहे लोकसभा निवडणूक 2019 मतदान? पहा महाराष्ट्र राज्यातील 48 मतदारसंघाचं संपूर्ण वेळापत्रक
मनसेची भूमिका काय?
भाजप आणि मोदी-शाह ह्यांच्या विरोधात प्रचार करा, महाराष्ट्र सैनिकांना आदेश आहे की तुम्ही ही जोडी सत्तेच्या बाहेर काढा. आत्ताची लढाई ही पक्षाशी नाही तर मोदी आणि अमित शाह ह्यांच्या विरोधात आहे आणि म्हणूनच त्यांच्या उमेदवारांना मतदान न करणं आणि त्यांना मदत न करणं हाच उद्देश आहे
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) March 19, 2019
मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना राज ठाकरे 'मै भी चौकीदार' या कॅम्पेनवरही बरसले. भाजप आणि मोदी-शाह ह्यांच्या विरोधात प्रचार करण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले आहेत. आत्ताची लढाई ही पक्षाशी नाही तर मोदी आणि अमित शाह ह्यांच्या विरोधात आहे आणि म्हणूनच त्यांच्या उमेदवारांना मतदान न करणं आणि त्यांना मदत न करणं हाच उद्देश आहे असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
राज ठाकरे सविस्तर भूमिका येत्या गुढी पाडव्याला म्हणजे 6 एप्रिल 2019 दिवशी मांडणार आहेत. आता विधानसभेच्या निवडणूकांसाठी सज्ज व्हा असा आदेश त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.