महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आगामी लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election) लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. याबद्दल मनसे नेते गिरीष सावंत यांनी पत्रकाद्वारे माहितील दिली आहे. त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) निवडणुकीबाबत काय भुमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मनसेनेने 2014 मध्ये लोकसभा निवडणुक लढवली होती.तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरे राष्ट्रवादी पक्षाला साथ देणार असल्याचे म्हटले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांनी दिलेले भाषण राज ठाकरे वाचून दाखवतात अशी टीका केली होती. त्यामुळे राजकरणात वातावरण तापलेले दिसून येत आहे. मात्र राज ठाकरे यांनी लोकसभेबद्दल योग्य भुमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे 13 व्या वर्धापन दिनी सांगितले होते.(हेही वाचा-राज ठाकरे यांचा 19 मार्चला मुंबईत मेळावा, राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची घोषणा करणार?)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदाची "लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९" लढविणार नाही, बाकी १९ मार्च २०१९ ला बोलूच... जय महाराष्ट्र!#LokSabhaElections2019 pic.twitter.com/tq8La2y4qt
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) March 17, 2019
राज ठाकरे यांनी येत्या 19 मार्च रोजी मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या वेळी राज ठाकरे मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. त्याचसोबत राष्ट्रवादीला (NCP) पाठिंबा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात प्रचार करणार का असे ही प्रश्न आता उपस्थित राहत आहेत.