स्वातंत्र्यलढ्यातील मवाळ गटाचे नेते, समाजसुधारक गोपाळ गणेश आगारकर (GopalAgarkar) यांच्या पुतळ्याचे काही दिवसांपूर्वी समाजकंटकांकडून नासधूस करण्यात आली आहे. कराड (Karad) येथील टेंभू (Tembhu) या आगरकरांच्या मूळ गावामध्येच हा अनुचित प्रकार घडला आहे. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राज ठाकरेंचे व्यंगचित्र
#SocietyReformation #Lokmanya #BalGangadharTilak #GopalAgarkar #EVM #Unemployment #WorkersStrike #FarmerSuicide #AtrocitiesOnWomen #EducationSystem #ReligiousConflicts #CasteHostility #MoneyLaundering pic.twitter.com/kN1OcOyYYK
— Raj Thackeray (@RajThackeray) January 21, 2019
महराष्ट्रात सद्य स्थितीतले प्रश्न आणि समस्यांच्या विळख्यात लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगारकर उभे आहेत. यामध्ये टिळक आगारांना उद्देशून,' गोपाळराव, आजची परिस्थिती पाहता आपण जे बोलत होतात ते पटायला लागलयं !' असे चित्र राज ठाकरेंनी रेखाटलं आहे. सध्या भाजपा सरकारच्या काळात शिक्षणाच्या खालावलेल्या दर्जापासून ते धार्मिक आणि जातीय संघर्षावर टीका केली आहे.
आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना
काही अज्ञातांनी दगडाने आगरकर्यांच्या चेहर्याचं विद्रुपीकरण केलं आहे. या प्रकारानंतर आगरकर प्रतिष्ठानने त्यांचा पुतळा झाकून ठेवला आहे. हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या कारणामुळे केला आहे? याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र आगरकरांच्या नातेवाईकांनी टेंभू गावात येऊन कराड ग्रामीण पोलिसात तक्रार केली आहे. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारची घटना समोर आली होती मात्र तेव्हा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.